
एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त असलेल्या शेतकऱयांचे वीज कनेक्शन दोन दिवसांपासून तोडण्यात आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले बागलाणचे भाजप आमदार दिलीप बोरसे यांना केरसाने-दसाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. जोपर्यंत शेतीसाठी लागणाऱया विजेची जोडणी केली जात नाही तोपर्यंत बाहेर पडू देणार नाही असा पवित्रा घेत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर वीज कनेक्शन पूर्ववत करण्याबरोबरच पुढील सहा महिने वीजपुरवठा खंडित होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर आमदार बोरसे व त्यांच्या सहकाऱयांना बाहेर काढण्यात आले.



























































