भर बैठकीत ह्रदयविकाराचा झटका, भाजप आमदाराचे निधन

उत्तर प्रदेश येथील बरेली येथे बैठक सुरु असताना भाजप आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी मेडिसिटी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डॉ. श्याम बिहारी लाल यांनी एक दिवस आधी त्यांचा वाढदिवस साजरा केल्याचे वृत्त आहे. ते फरीदपूर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. एका बैठकीत त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.