
भाजपचे ऐरोली विधानसभा क्षेत्रातील आमदार गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाण्यातील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार होती. आता जामिनासाठीची सुनावणी 27 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश नाईक यांना दिलासा मिळालेला नाही.
नाईक यांच्या विरोधात नेरुळ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. नाईक यांच्या विरोधात एका महिलेला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या गुह्याला 24 तास उलटत नाही तोच त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे.

























































