भाजप आमदार सातपुते यांच्या लग्नसोहळ्यात कोरोना नियमांचा ‘बॅण्ड’ वाजला, फडणवीसांसह आमदार, खासदार उपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांचा शाही विवाहसोहळा रविवारी पुण्यात पार पडला. या सोहळ्यात सहभागी झालेल्या भाजपच्या नेत्यानींच सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविले. कोरोनावरून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बोंबा मारणारे भाजपचे नेतेच नियमांचा फज्जा उडवित असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपचे आमदार राम सातपुते यांचे पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथील विवाह सोहळ्यात नियमांपेक्षा जास्त संख्या दिसून आली. सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही. मास्क वापरण्यात आले नव्हते. या विवाहसोहळ्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, खासदार गिरीश बापट, आमदार प्रशांत परिचारक, नितेश राणे यांच्यासह खासदार, आमदारांनी हजेरी लावली होती.