मुन्ना बजरंगीची हत्या देवानेच घडवली, भाजप आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वाराणसी

कायम बेताल वक्तव्य करणारे भाजपचे उत्तर प्रदेशमधील आमदार सुरेंद्र सिंग यांनी आज पुन्हा एकदा अजब वक्तव्य केलं आहे. माफिया डॉन प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगी याची हत्या ईश्वरानेच घडवून आणल्याचे म्हटले आहे. तसेच हे सांगताना बजरंगी याच्या हत्येमध्ये हिंदुस्थानच्या संविधानामुळे उशीर होत होता मात्र देवानेच हत्या करण्यासाठी गुंड सुनील राठी याला प्रेरणा दिल्याचे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

‘बजरंगी हा तुरुंगात मारला गेला असला तरी त्याची हत्या या विश्वाचा कर्ताहर्ता असलेल्या इश्वरानेच घडवली आहे. संविधानामुळे यात उशीर झाला होता मात्र इश्वराने सुनील राठीला प्रेरणा देऊन बजरंगीची हत्या घडवली. जो जसे करेल त्याला तसेच भोगावे लागेल. जवळपास ४०ते ५० तरुणींना विधवा करणारा आणि कृष्णानंद राय यांची हत्या करणारा मारला गेल्याने मी खूप खूष आहे, असे सुरेंद्र सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

उत्तर प्रदेशमधील कुख्यात माफिया डॉन प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगी याची बागपत तुरुंगात ९ जुलै रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कुख्यात गुंड व शूटर सुनील राठी याने मुन्नावर दहा गोळ्या झाडल्या. यात त्याचा मृत्यू झाला आहे.