भाजप खासदाराच्या सुरक्षा रक्षकाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या 

756
प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या सुरक्षा रक्षकाने दिल्लीत त्यांच्या शासकीय निवासस्थानावर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऊनिश असे मयत सुरक्षा रक्षकाचे नाव होते.

मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय ऊनिश हे दिल्ली पोलिसच्या सुरक्षा पथकात हेड कॉन्स्टेबल म्हणून तैनात होते. त्यांना सध्या खासदारांच्या संरक्षणाखाली तैनात करण्यात आले होते. बुधवारी दुपारी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या शासकीय निवास्थानी ऊनिश आपल्या ड्युटीवर हजार झाले. त्यावेळी ते तणावात असल्याचे दिसत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी दुपारी 4 वाजून 25 मिनिटाला त्यांनी याच शासकीय निवासस्थानाच्या एका खोलीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या ठिकाणाहून कोणतेही मृत्यूपूर्वी लिहिलेले पत्र मिळाले नाही. दिल्ली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या