भाजप खासदार कंगना रनौत नाचली पाकिस्तानच्या गाण्यावर, सोशल मीडियावर ट्रोल

सध्याच्या घडीला देशभरात पाकिस्तानविरोधी वारे वाहात असताना, भाजप खासदार कंगना रनौतने एक नवा पराक्रम केलेला आहे. भाजप खासदारने आपल्या रिलमध्ये पाकिस्तानी गाणे लावले आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या अलिकडच्या जयपूर ट्रिपमधील एक रील शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये, कंगना एका हॉटेलमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात दर्जेदार वेळ घालवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

11 मे रोजी, कंगना रनौतने मोरांसोबत नाचताना आणि झाडावरून आंबे तोडतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. तिने पोस्टला कॅप्शन दिले, “जिंदा रहने केलीये सिर्फ एक चीज जरूरी है और वो है जिंदगी, आशा आहे की आपण फक्त जगू नये तर जिवंत आणि उत्साही देखील राहू.” परंतु कंगनाने या रिलमध्ये पाकिस्तानातील संगीतकार जोडी जैन आणि जोहैब यांचे रांझेवा वे हे गाणे वापरले आहे.

 

झैन आणि जोहिब हे पाकिस्तानातील लाहोर येथील कव्वाली बँड आहेत. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये वापरलेले या जोडीचे गाणे 2023 मधील या जोडीचे पंजाबी गाणे आहे. तरीही, सोशल मीडियावर तिला तिच्या पोस्टमध्ये पाकिस्तानी कलाकारांची गाणी वापरू नयेत असा सल्ला दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हिंदुस्थानातील पाकिस्तानी कंटेंट आणि कलाकारांवर कडक बंदी घातल्यानंतर हे घडले. कंगनाच्या पोस्टवरील अनेक कमेंट्समध्ये तिला पाकिस्तानी गाणे वापरण्याबद्दल सावध करण्यात आले आणि सीमेवरील वाढत्या तणावाची आठवण करून देण्यात आली होती.