Goa भाजपचा सत्ता स्थापनेचा दावा, घटकपक्ष घालू शकतो खोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे मुख्यमंत्रीपद रिक्त झाल्यानंतर भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. सध्या भाजपचे अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजपचे गोव्यातील आमदार यांच्यात पणजी येथील हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानले जाणारे प्रमोद सावंत देखील या बैठकीला उपस्थित आहेत. दरम्यान भाजपचा मित्रपक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने तीन मंत्रीपदाची मागणी केल्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाल्याचे समजते

गोव्यात भाजपचे 14 तर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे तीन आमदार मिळून सत्तास्थापन केली आहे. भाजपकडून पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर मगोपाने त्यांच्या तिनही आमदारांना मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे भाजप अडचणीत सापडली आहे. मगोपने दोन उपमुख्यमंत्रीपदे करण्याची मागणी केली आहे.