भाजपचे राज्यभरात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर भाजपने या प्रकरणाचं जोरदार राजकारण सुरू केलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करीत भाजपकडून मुंबईसह राज्यभरात आंदोलन करण्यात आले.

मुंबई, अमरावती, सिंधुदुर्ग अशा विविध जिह्यांत भाजपकडून आंदोलने करण्यात आली. सरकारविरोधात घोषणाबाजी, बॅनरबाजी करीत हे आंदोलन करण्यात आले.

पोलीस लोकांना धमकावतात,  आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात, यांना पाठीशी घातले जात आहे. अनिल देशमुख यांच्या रूपात सचिन वाझेंच्या पॉलिटिकल बॉसची पहिली कडी उलगडली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.