भाजपच्या प्रवक्त्याची मराठी विश्वकोश मंडळावर वर्णी

राज्य सरकारने आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना केली असून मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची नेमणूक केली आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपचे प्रवत्ते केशव उपाध्ये यांची वर्णी लावण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या अध्यक्ष व सदस्यांचा कालावधी 26 मे 2024 रोजी संपुष्टात आला होता. तेव्हापासून या मंडळावरील नियुक्त्या केल्याच नव्हत्या. आता मंडळाची पुनर्रचना करताना विविध क्षेत्राशी संबंधित अशा अध्यक्ष व उपाध्यक्षांसह एकूण 24 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. रवींद्र शोभणे तर उपाध्यक्षपदी केशव उपाध्ये यांची नियुक्ती करतानाच सदस्य म्हणून प्रा. डॉ. नरसिंग कदम, डॉ. आदित्य अभ्यंकर, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. विनयकुमार आचार्य, डॉ. रोहित होळकर, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अनंत देशमुख, श्रीकांत बोजेवार, डॉ. मुकुंद कुळे, विश्वास पाटील, प्राजक्त देशमुख, प्रा.बी.एन.पाटील, डॉ. केशवचैतन्य कुंटे, डॉ. मिलिंद वाटवे, महेश केळुसकर, वामन मधुसूदन पंडित, नमिता कीर, अशोक राणे, प्रा. डॉ. सुरेश व्यंकटराव कदम, महादेव लक्ष्मण देसाई, वृंदा कांबळी आणि डॉ. शरयू आसोलकर यांची वर्णी लावण्यात आली आहे.