श्रीरामपूर : भाजपच्या जिल्हा संघटन सरचिटणीसासह 14 जण हद्दपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्यासह तेरा जणांवर पोलीस प्रशासनाने हद्दपारीची नोटीस बजावली. विशेष म्हणजे उर्वरित 12 जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने चित्ते यांच्यावर झालेल्या कारवाईचा काही संघटनांकडून निषेध नोंदविण्यात आला. राजकीय आकसातून कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता रहावी यासाठी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये चित्ते यांच्यासह अल्तमेश पेंटर उर्फ यूनूस शेख, मयूर विष्णू जाधव, विकास उर्फ सनी भानुदास गोरे, विजय उर्फ विजू बबन चव्हान, शरिफ लतिफ शेख, सर्फराज शेरखान पठाण, संतोष एकनाथ वायकर, पक्या उर्फ प्रदीप लालचंद काळे, दत्तात्रय जगन्नाथ जाधव, प्रकाश शिवाजी रणन्नवरे, सुरेश योहान उबाळे, सचिन उर्फ गुड्डू कृष्णा वायकर, रावजी उर्फ बिट्टू कृष्णा वायकर यांचा समावेश आहे. सर्वांना 18 तारखेपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली.