
संगमेश्वर तालुका भाजपाच्या सचिव पुजा उबारे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे आता काटवली ग्रामपंचायत सरपंचपदाची धुरा उबारे यांच्या खांद्यावर दिली जाणार आहे. शिवसेनेची राज्यात सुरू असणारी वेगवान घौडदौड पाहून आपण शिवबंधन बांधत असल्याचे पूजा उभारे यांनी पक्ष प्रवेशाची सांगितले .
रवीराज बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेशावेळी माजी राज्यमंञी रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, सभापती सुजित महाडीक, महिला जिल्हा संघटक नेहा माने, वेदा फडके, शिरुभाऊ घाग, प्रभाकर गुरव ,संजय घाग आदि उपस्थित होते.
यावेळी विलास चाळके यांनी जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाल्याचे सांगितले. सुभाष बने यांनी तालुक्याचा आढावा घेताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेला त्या काळात शृंगारपूर, काटवली, कुंडी, बामणोली या खोर्यातील गावांनी चांगला आधार दिला तो आजही कायम आहे. उबारे यांच्या माध्यमातून काटवली गावचा विकास चांगला होईल. त्यांना शिवसेना कायम सहकार्य करेल, असे सुभाष बने म्हणाले. रवींद्र माने यांनीही काटवली गाव आदर्श गाव आहे आता शिवसेनेच्या माध्यमातून आणखी चांगले काम होईल असा विश्वास व्यक्त केला. पूजा उबारे यांना शिवसेना प्रवेशासाठी संजय घाग यांनी विशेष प्रयत्न केले .



























































