
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसा राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढत आहे. यंदा दिल्लीत भाजप 45 हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.
अमित शहा यांनी ट्विट करून भाजपला 45 हून जागा मिळतील अशा विश्वास व्यक्त केला आहे. शहा म्हणाले की,निवडणुकांदरम्यान जनतेशी संवाद साधण्याची संधी मिळाली. दिल्लीकरांना फक्त खोटी वचने, लांगूनचालन आणि अराजकता मिळाली. या सर्व गोष्टींना कंटाळून दिल्लीला विकास हवा आहे. दिल्लीत भाजपला जे समर्थन मिळाले त्यावरून भाजपला 45 हून अधिक जागा मिळतील असा विश्वास आहे, असे शहा म्हणाले.
चुनाव के दौरान दिल्ली की जनता से संवाद करने का मौका मिला। झूठे वादे, तुष्टिकरण और अराजकता से त्रस्त दिल्ली को अब बस विकास चाहिए।
दिल्ली में भाजपा के लिए जो समर्थन देखा है उससे ये साफ है कि 11फरवरी को भाजपा दिल्ली में 45 से अधिक सीट जीत कर सरकार बनाने जा रही है। #BJP45PlusInDelhi
— Amit Shah (@AmitShah) February 6, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारानंतर जनमत बदलल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे. या रॅलीनंतर भाजपने अनेक ठिकाणी सर्वेक्षण घेतले आहे. त्यात शाहीन बाग, सर्जिकल स्ट्राईक आणि बाटला हाऊस सारख्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी लोकांशी संवाद साधला आहे. त्यामुळे लोकांच्या मतपरिवर्तन झाल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.



























































