
घुसखोर बांगलादेशींसाठी वकिली करणाऱ्या भाजपच्या खोट्या देशभक्तीचा बुरखा शिवसैनिकांनी टराटरा फाडला होता. कल्याणमधील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अॅड. एस. ए. दुबे यांनी बांगलादेशींच्या बचावासाठी वकीलपत्र घेतले होते. याचे वृत्त खोट्या देशभक्तीचा पर्दाफाश झाला आणि बांगलादेशींचे वकीलपत्र मागे घेतले असल्याचे त्यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितले.
दैनिक ‘सामना’ मधून प्रसिद्ध होताच दुबे यांच्या कल्याण पूर्व भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अॅड. एस. ए. दुबे हे मानपाडा पोलिसांनी पकडलेल्या सहा बांगलादेशी महिलांच्या बचावासाठी वकीलपत्र घेऊन न्यायालयात त्यांची बाजू मांडत असल्याची बाब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण पूर्व विधानसभा संघटक नारायण पाटील यांनी पुराव्यासह गुरुवारी समोर आणली होती. त्यामुळे एकीकडे बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोहीम राबवायची आणि दुसरीकडे पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांसाठी कोर्टात वकिली करायची असा दुटप्पी कारभार भाजपचा उघड झाला