‘काळादिन’फेरीला मज्जाव; भुवनेश्वरी पूजनास परवानगी, कर्नाटक सरकारचा दुजाभाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत कर्नाटक प्रशासनाने एकीकडे 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवदिनानिमित्त काढण्यात येणाऱया राज्योत्सव मिरवणुकीला परवानगी नाकारली असली, तरी भुवनेश्वरी पूजनास कन्नडिगांना थेट परवानगी दिली आहे. दुसरीकडे मराठी भाषकांना मात्र सीमाभागात काळादिन फेरी काढण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे.

1956च्या भाषक प्रांतरचनेवेळी विरोध असूनही मराठी भाषकांना कर्नाटकात घुसडण्यात आले. गेल्या चार पिढय़ांपासून सीमाभागातील मराठी भाषक महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवदिनी सीमाभागात मराठी भाषकांकडून कडकडीत हरताळ व काळादिन पाळण्यात येतो. काळी वस्त्र्ाs परिधान करून सीमाभागात मूक सायकलफेरी काढण्यात येते. बेळगाव हे मराठी भाषक लढय़ाच्या चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दरवर्षी मराठी भाषकांना या मूक फेरीला परवानगी देण्यास कानडी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो, तसेच मूक फेरीनंतर मराठी भाषकांवर दगडफेक करण्यासह युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून, दडपशाही करण्यात येते.

1 नोव्हेंबर रोजीच्या नियोजनासंदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त के. त्यागराजन, जि. प. अध्यक्षा आशा ऐहोळे आदींच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची नुकतीच बैठक झाली. यामध्ये यंदा 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव साध्या पद्धतीने साजरा करून दरवर्षीप्रमाणे राज्योत्सवाची मिरवणूक न काढता केवळ भुवनेश्वरी पूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांनी नियमांचे पालन करून उत्सवात सहभागी व्हायचे असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले. याचवेळी मराठी भाषकांच्या काळादिन फेरीला परवानगी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेची उद्या बेळगावात बैठक

– सीमाभागात होणाऱया 1 नोव्हेंबर काळादिनासंदर्भात बेळगाव येथे शिवसेनेच्या रामलिंगखिंड गल्लीतील कार्यालयात मंगळवारी पदाधिकाऱयांची बैठक बोलविण्यात आली आहे. तसेच, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी सांगितले.