
चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तसेच साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या दोन्ही दुर्घटनांवर भाजप आमदार अमित साटम विधिमंडळ परिसरात हसले होते. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साटम आणि भाजपवर सडपून टीका केली. त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या साटम यांच्याविरोधात मनसेने रविवारी निदर्शने केली. भांडुपमधील डी. ए. व्ही. महाविद्यालयासमोर मनसैनिकांनी साटम यांना काळे झेंडे दाखवले व भाजपच्या बॅनरला काळे फासून संताप व्यक्त केला.





























































