काळ्या बिबट्याचा परिवार वाढला, ताडोबातील पर्यटकाना सुखावणारी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताडोबाचा जंगलात अनेक दुर्मिळ प्राण्यांच्या अधिवास आहे. खुल्या क्षेत्रात दुर्मिळ पांढरे हरीण दिसलं होतं. आता ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना सुखावणारा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ताडोबात काळ्या बिबट्याच्या वावर आहे. पर्यटकांना अनेकदा तो दृष्टीपथास पडला. या काळ्या बिबट्याचा परिवार वाढला आहे.

वन कर्मचाऱ्यांना गस्तीवर असताना त्यांना ताडोबाच्या मदनापूर प्रवेशद्वाराजवळ बिबट्याची काळी पिल्लं दिसली आहेत. आईच्या मागे काळ्या रंगाची दोन पिल्लं जात आहेत. काळ्या बिबट्यापाठोपाठ आता बिबट्याच्या काळ्या पिल्लांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काळ्या बिबट्याच्या हा व्हिडिओ समाज माध्यमात वायरल झाला आहे.