गुरुदासपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 19 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. यात 19 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गुरुदासपूरच्या बटाला भागात असणाऱ्या फटाक्यांच्या कारखान्यात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास स्फोट झाले. स्फोट एवढा भीषण होता की, हा कारखाना पत्याच्या बंगल्यासारखा कोसळला. कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच नूरपूर (कांगडा) आणि लाडोवाल (लुधियाना) इथून एनडीआरएफचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू झाले.

भीषण दुर्घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला असून 430 ते 35 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 50 मजूर गायब असून ढिगाऱ्याखाली ते अडकले असण्याची शक्यता आहे. प्रशासना कडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि गुरुदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले.