बोर्डाची परीक्षा कशी देणार? कोरोनामुळे रायटर्स मिळेनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे वर्षभर अनेक अडचणींवर मात करून दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱया दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी रायटर्स आणि वाचनिक मिळतील का, याची चिंता लागली आहे. यंदा कोरोनामुळे परीक्षा केंद्रावर जाऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे पेपर्स लिहिण्यासाठी नववी आणि अकरावीचे विद्यार्थीच तयार नसल्याचे समोर आले आहे. गेल्या महिनाभरापासून रायटर्स मिळविण्यासाठी धडपडणाऱया पालकांच्या शोधमोहिमेलाही यश आलेले नाही. पालकांनी अखेर बोर्डाच्या समुपदेशकांकडे संपर्क साधला असून रायटर्स मिळवून देण्याची विनंती केली आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या शिफारशीनंतर रायटर्स उपलब्ध करून दिले जाणार. दिव्यांग विद्यार्थ्यांना मागील इयत्तेचा विद्यार्थी अथवा प्रौढ रायटर्स नेमून देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना.

खालसा कॉलेजमध्ये बारावी कॉमर्सला शिकणारा परमित सिंग चन्ना लार्ंनग डिसऍबिलिटीने ग्रस्त आहे. त्याला परीक्षा देण्यासाठी अकरावीत शिकणाऱया रायटर्सची गरज आहे, मात्र मागील कित्येक दिवस प्रयत्न करूनही परमितचे पेपर लिहिण्यासाठी एकही विद्यार्थी तयार झालेला नाही, असे त्याची आई दलजित चन्ना यांनी सांगितले. दहावीत असताना परमितने रायटर्सच्या सहाय्याने परीक्षा दिली होती, त्याला 75 टक्के गुण मिळाले होते. पण आता अभ्यासाचा वेळ रायटर्स शोधण्यात वाया जात असल्याचेही दलजित म्हणाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मुंबईत अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा केंद्रावर जाऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे रायटर्स बनण्यात नववी तसेच अकरावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक तयार नाहीत.
दहावी, बारावीचे दिव्यांग विद्यार्थी चिंतेत

रायटर्स बँक
कोणताही दिव्यांग विद्यार्थी रायटर्स मिळणे अथवा इतर कोणत्याही सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने रायटर्स बँक तयार केली आहे. इच्छुकांनी या बँकेत 31 मार्चपूर्वी नावनोंदणी करावी, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. नावनोंदणीसाठी लिंक http://www.research.net/r/readerwriteRank.