
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोअर परळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ, लोअर परळ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २६ जुलै रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ४:३० या वेळेत लोअर परळ येथील ना. म. जोशी शाळेत हे शिबीर पार पडणार आहे.
यानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले. या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले व वरळी विधानसभा कक्ष संघटक कृष्णकांत शिंदे यांनी केले आहे.
संपर्क : अमर गावडे – ७३७८९७७९६९, संदीप चौरे – ९९३०४७३०४८.





























































