
सामना प्रतिनिधी, वरोरा
चंद्रपूर जिल्हा शिवसेना आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोग निदान व उपचार शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात 1140 रुग्णांनी रोग निदान व उपचार करून घेतले तर १२५ रुग्णांची निवड शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी शिवसेनेच्यावतीने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या मदतीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात केले होते.
संततधार पाऊस सुरू असताना देखील सकाळी नऊ वाजेपासूनच या शिबिरात रुग्णांनी मोठी गर्दी केली होती. रक्तदाब, शुगर, किडनीचे आजार हृदयविकार, डोळ्याचे आजार, लहान मुलांचे व स्त्रियांवरील आजारांवरील निदान व उपचारसाठी विविध तज्ज्ञ शिबिरात उपस्थित होते. या शिबिरात लघवी व रक्त तपासणी तसेच एक्स-रे ची आणि औषधीची व्यवस्था मोफत करण्यात आली होती. या शिबिराचे उद्घाटन डॉ. मृणाल काळे प्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा यांनी केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र ढवस तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विवेक तेला आणि रोटरीचे माजी प्रांतपाल समीर बारई, संदीप मेश्राम उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इच्छेनुसार वाढदिवसाला जाहीरातीवर खर्च न करता गरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
शिवसेना स्थापनेपासूनच आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित करून गरीब गरजू रुग्णांना त्याचा लाभ देत आली आहे. तोच वसा शिवसेनेने पुढे चालू ठेवला असून नितीन मत्ते यांनी या शिबिराचे आयोजन करून त्याची पुन्हा एकदा समाजाला आठवण करून दिली आहे. असे डॉ मृणाल काळे आपल्या मनोगतातून म्हणाले. डॉ. राजेंद्र ढवस, डॉ.विवेक तेला यांनीही आपल्या मनोगतातून शिवसेनेच्या या स्तृत्य उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रशांत खुळे यांनी केले तर शिवसेना तालुका प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले या शिबिराला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) चे डॉ. नितीन धांडे शिबीर प्रमुख म्हणून उपस्थित होते. तर गंगाधर तडस, राजेश गडरिया यांनी वैद्यकीय समाजसेवकाची भूमिका पार पाडली. शिबिरात आलेल्या रुग्णांवर निदान व उपचारासाठी विविध विषयातील 22 तज्ञ डॉक्टर, पाच परिचारिका यावेळी उपस्थित होत्या. समीर हक्के, लक्ष्मण ठेंगणे ,शंकर धानकी,प्रवीण कळस्कर, सागर पिंपळशेंडे, भूषण बुरीले, मनीषा काकडे, दीपाली माटे, दिनेश यादव, वसंता मानकर, भास्कर ताजने, ज्ञानेश्वर डुकरे, नदू पडाल, प्रमोद नागोसे, रवी राय, घनश्याम आस्वले, या सह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या शिबिरात उपस्थिती दर्शवून रुग्णांना मदत केली. या शिबिरात 75 शिवसैनिकांनी रक्तदान केले. त्यापैकी 45 बॉटल रक्त सावंगी मेघे रुग्णालयाला तर 30 बॉटल रक्त जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरला पाठविण्यात आले.



























































