
सध्या महाराष्ट्रात रक्त पुरवठा कमी पडत असून रक्त पुरवठा सुरळीत व्हायला हवा यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. याच भूमिकेतून मा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल कर्डीले राजुराचे गट विकास अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती राजुरा येथे रक्तदान शिबीरेचे आयोजन करण्यात आलं होते.
या प्रसंगी मा आमदार सुभाष धोटे , सभापती मुमताज अब्दुल जावेद, उप सभापती श्री मंगेश गुरनुले ,गट शिक्षण अधिकारी श्री विजय परचाके, श्री अमित महाजनवार , श्री महेंद्र डाखरे , श्री प्रमोद जल्लेवार, श्री साहेबराव पवार , श्री अरुण मेश्राम, श्री संजय हेडाऊ श्री श्रीराम मेश्राम उपस्थित होते. यादरम्यान सर्व शिक्षण संघटना, ग्रामसेवक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, रोजगार सेवक, पंचायत समिती अधिकारी कर्मचारी ,पशुसंवर्धन विभागातील एकूण 166 जणांनी नोंदणी करून त्यापैकी 130 जणांनी आज यशस्वी रित्या रक्तदान केले. विशेष म्हणजे महिला कर्मचारी यांनी सुध्दा रक्तदानात मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता.
























































