15 ऑगस्टला रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन

बीआयटी चाळ क्रमांक 3 रहिवासी व मित्र मंडळ पालनजी रतनजी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.) यांच्या वतीने मंगळवार, 15 ऑगस्ट रोजी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी सोमय्या रुग्णालय रक्तपेढी सायन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. लुनावा भवन, दादोजी काsंडदेव मार्ग, भायखळा येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत या शिबिरात ईसीजी चाचणी, रक्त चाचणी, शुगर चाचणी, नेत्र तपासणी आणि गायनोकॉलोजी तपासणी केली जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.