परळ येथे आज रक्तदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  शिवसेना शाखा क्र. 204, परळ येथे 18 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

परळ ‘बेस्ट’ कर्मचारी वसाहत, राजकमल लेन येथे सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हे रक्तदान शिबीर होणार आहे. मुंबईत रक्ततुटवडा निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याचे आयोजक नगरसेवक अनिल कोकीळ यांनी सांगितले.