भायखळा ब्रिजवर हाईट बॅरियर, अवजड वाहनांना रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

भायखळ्याच्या उड्डाणपुलावर अवजड वाहनांना रोखण्यासाठी पालिका आता हाईट बॅरियर बसविणार आहे. आयआयटीने केलेल्या सेफ्टी ऑडिट पाहणीनंतर भायखळा, चिंचपोकळी आणि करीरोड येथील उड्डाण पुलांवर वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यात आली होती.

गेल्यावर्षी 3 जुलै रोजी अंधेरी येथील गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर मध्य रेल्वेने रेल्वे ट्रकवरून जाणाऱया 299 बांधकामांची आयआयटीच्या पथकाद्वारे तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर भायखळा, चिंचपोकळी आणि करीरोडच्या पुलांवरील वाहतूकीवर संपूर्ण निर्बंध घातले नसले तरी या पुलांवर अवजड वाहतूक रोखण्याची शिफारस केली होती. सध्या या तिन्ही पुलांवर दर ताशी 30 कि.मी.च्या वेगापेक्षा जादा वेगाने वाहने चालवू नयेत तसेच घाटकोपरसह भायखळा, चिंचपोकळी आणि करीरोड पुलांवर 16 टनापेक्षा जास्त वजनाच्या ट्रेलरना परवानगी देऊ नये असे आयआयटीने म्हटले आहे.

भायखळा ब्रिज
– डॉ.आंबेडकर रोड ते जे.जे. उड्डाणपूल z वाहनांना ताशी 30 कि.मी.च्या वेगाचे बंधन z 16 टनापेक्षा जादा वजनाच्या ट्रेलरना बंदी