
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दर पाच वर्षांनी प्रभाग रचना केली जाते. त्यासाठी काही हरकती किंवा सूचना असल्यास कायद्याप्रमाणे त्या मागवण्यात येतील. या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येईल. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्या संदर्भात असलेल्या हरकती आणि सूचना दिलेल्या कालावधीत नोंदवण्यात याव्यात, असे राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेची 2022 मध्ये होणारी निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत प्रभागांची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली होती. त्याला निवडणूक आयोगाने आज उत्तर दिले.
























































