मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना यंदा 40 हजार बोनस द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

भडकलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महिन्याच्या खर्चाची तोंडमिळवणी करताना कर्मचाऱयांना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करावा, अशी जोरदार मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे कामगार संघटनांच्या समन्वय समितीतर्फे केली आहे.

मुंबई पालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, परिसेविका, तंत्रज्ञ, अभियंते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंशकालीन, कंत्राटी कामगार यांच्यासाठी 2017-18 या वर्षासाठी प्रशासनाने 156.7 कोटींची तरतूद केलेली आहे. यामुळे बोनस देण्यात यंदा हात आखडता घेऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे.

पालिका कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या सामुदायिक गट विमा योजनेला दिलेली स्थगिती मागे घ्यावी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीशी चर्चा करून ही विमा योजना सुरू करावी. बायोमेट्रिक हजेरीमध्ये असलेल्या त्रुटी दूर कराव्यात तोपर्यंत बायोमेट्रिक हजेरी वेतनाशी जोडू नये अशा मागण्याही बाबा कदम यांनी केल्या आहेत. तसेच या मागण्यांबाबतचे एक निवेदन मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फतही आयुक्तांना दिलेले आहे. या समन्वय समितीत विविध कामगार संघटना सहभागी असून या संघटनांच्या प्रमुख कामगार नेत्यांच्या स्वाक्षऱया निवेदनावर असल्याचे त्यांनी सांगितले.

summary- bmc employees should get 40 thousand as bonus