
पालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन म्हणून देण्यात येणाऱ्या पाच हजारांच्या मुदत ठेव भत्त्याचे वितरण आता पोस्टाच्या माध्यमातून होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांच्या हस्ते आज हा मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला. आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षी ही मुदत ठेव संबंधित मुलीला देण्यात येते. ही मुदत ठेव राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून देण्यात येत होती.
पीएफचे व्याज जमा होणार
सेवानिवृत्ती निधीशी संबंधित संघटना ईपीएफओने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यात जमा झालेल्या ठेवींवर आर्थिक वर्ष २०१९-२० साठी ८.५ टक्के व्याजाचा मोठा हिस्सा खातेदारांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयाचा फायदा ईपीएफच्या सुमारे ६ कोटी ग्राहकांना होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्तांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

























































