मुंबई महापालिकेतील 38 हजार 128 पदांवर नेमणुकाच नाही! रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम,

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेतील 38 हजार 128 पदांवर नेमणुकाच झाल्या नसल्याचे माहिती अधिकार कायद्यातंर्गत उघड झाले आहे. रिक्त पदांमुळे पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत असून सर्वाधिक रिक्त पदे ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील आहेत.

सरळसेवा आणि पदोन्नतीअंतर्गत महापालिकेत 1 लाख 10 हजार 509 पदे मंजूर आहेत. यांपैकी 38 हजार 128 पदे रिक्त असून यातील सर्वाधिक 33 हजार 43 पदे ही ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील असल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती मागविली होती. विभागाने सप्टेंबर 2020 पर्यंतची उपलब्ध अभिलेखाची माहिती दिली आहे.

मुंबई महापालिकेतील पदे मोठय़ा प्रमाणावर रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी गलगली यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.

  • सरळसेवा तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण 87 हजार 146 पदे मंजूर असून त्यांपैकी 28 हजार 608 पदे रिक्त आहेत.
  • सर्वाधिक रिक्त पदे ‘क’ गटात 10 हजार 553 तर ‘ड’ वर्गात 15 हजार 789 इतकी आहेत.
  • यात पदोन्नती तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण 23 हजार 363 पदे मंजूर असून यातील 9 हजार 520 पदे रिक्त आहेत.