
मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या खासगीकरणाचा निर्णय 23 जुलैपर्यंत रद्द करा, अन्यथा सर्व कामगार संपावर जातील असा इशारा सफाई कामगारांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काम बंद आंदोलन 23 जुलैपर्र्यंत स्थगित करण्यात आले आहे.
कचरा संकलन करून वाहून नेण्याकरिता वाहने आणि सेवा कंत्राटदाराकडून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन करून आंदोलनाचा इशारा दिल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय बापेरकर, माजी आमदार कपिल पाटील, सुरेश ठाकूर, कॉ. विजय कुलकर्णी, रमाकांत बने आदी उपस्थित होते.
घनकचरा विभागाच्या विभागाच्या खासगीकरणाला विरोध करीत घेतलेल्या मतदानात तब्बल 97 टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने काwल दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आझाद मैदानात काढण्यात आलेल्या मोर्चेकऱयांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कामगारांची पदे कमी होणार नाहीत, लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू राहतील आणि मालकी हक्काची घरे मिळतील अशी आश्वासने दिली.
राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप
तुटपुंजा पगार आणि पंत्राटी पद्धतीने कामावर ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील 50 हजारांहून अधिक परिचारिका बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपामुळे राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमधील आरोग्यसेवेचा बोजवारा उडू शकतो. दरम्यान, आज परिचारिकांनी आझाद मैदानात दिवसभर कामबंद आंदोलन केले. मात्र, सरकारने संघटनेच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहेत.