पंधरा दिवसांत तीन हजार कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान, निवडणुकीच्या कामामुळे टेन्शन वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेची मालमत्ता करवसुली चांगलीच रखडली असून येत्या 15 दिवसांत तीन हजार कोटींवर मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट पालिकेला गाठण्याचे आव्हान आहे. यातच 70 टक्के कर्मचारी निवडणूक कामावर जाणार असल्याने ही वसुली कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेच्या मालमत्ता करवसुलीत यंदा मोठी घट निर्माण झाली आहे. मार्चअखेरपर्यंत 4,500 हजार कोटींचे लक्ष्य असताना 12 मार्च 2024 पर्यंत फक्त 1194.61 कोटी वसूल केले आहेत. गेल्या चार वर्षांत पालिकेने मालमत्ता करात वाढ केलेली नाही. राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर 26 फेब्रुवारीपासून बिल पाठवण्यास सुरुवात केल्याचे कर संकलन व निर्धारण विभागाचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी सांगितले.

पालिका म्हणते…

कर संकलन व निर्धारण विभागाचे 24 वॉर्डांत 250 हून अधिक निरीक्षक आहेत. यापैकी 70 टक्के निरीक्षक निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे मनुष्यबळाअभावी वसुली प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने 26 फेब्रुवारीपासून बिल पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता रोज 60 ते 70 कोटी रुपये मालमत्ता करापोटी जमा होत आहे.