
मोफत आणि अद्ययावत शिक्षण, टॅबमध्ये अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देणाऱया पालिकेने आता दहावीत सर्वप्रथम येणाऱया पहिल्या 25 विद्यार्थ्यांच्या पदवी-उच्च शिक्षणाचा खर्च करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यामध्ये अकरावी-बारावीच्या शिक्षणासह तांत्रिक, व्यावसायिक, वैद्यकीय पदवी-पदविका शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना 25 हजार पिंवा ते शिक्षण घेत असलेल्या अभ्यासक्रमाचा सर्व खर्च पालिकेकडून करण्यात येणार आहे. यामुळे पालिका शाळांत शिकणाऱया विद्यार्थ्यांना करीअरची सर्वेत्पृष्ट संधी मिळणार आहे.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शैक्षणिक वस्तू मोफत देण्यात येतात. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पालिका शाळेतील शिक्षण महत्त्वपूर्ण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आता पालिका शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांना माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम येणाऱया 25 विद्यार्थ्यांना करीअर घडवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून 25 हजारांचे अर्थसहाय्य करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अकरावी, बारावीमधील शिक्षणासह बारावीनंतर हिंदुस्थानातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 25 हजारांचे शुल्क पालिकेकडून देण्यात येईल. हे शुल्क विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क 25 हजारांपेक्षा जास्त असेल त्यांचे संपूर्ण वाढीव शुल्कही पालिकेकडून भरण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव आगामी शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. दरम्यान, पालिका शाळेत शिकणाऱया गोरगरीब विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महानगर पालिकेने दादर, मुलुंड आणि विलेपार्ले येथे खासगी संस्थांच्या मदतीने मोफत शिक्षण देणारी कनिष्ठ महाविद्यालयेही सुरू केली आहेत.
पालकांच्या उत्पन्नाची अट राहणार नाही
पालिकेच्या या योजनेच्या लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही. या अनुदानासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असून निधी कमी पडणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येणार आहे.
माध्यमिक शालान्त परीक्षेत गुणांची टक्केवारी समान असल्यास विज्ञान व गणित विषयांचे गुण विचारात घेतले जातील आणि या गणित, विज्ञानचे गुणही समान झाल्यास इंग्रजी विषयाचे गुण विचारात घेऊन 25 विद्यार्थ्यांमध्ये समावेश करण्यात येईल.
सध्या पालिकेच्या शाळांतून दहावीला 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सध्या 10 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येते. तर, 90 ते 94.99 पर्यंत टक्के असलेल्या विद्यार्थ्यांना 5 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येते.
दहावीपर्यंतच्या शाळा वाढवणार
पालिकेच्या अनुदानित आणि विनाअनुदानित मिळून दहावीपर्यंतच्या 218 शाळा आहेत. तर आठवीपर्यंत शिक्षण देणाऱया 914 शाळा आहेत. दरम्यान, आठवीनंतर शिक्षण देणाऱया शाळा कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते पिंवा सोय न झाल्यास हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जातात. त्यामुळे आगामी काळात दहावीपर्यंतच्या शाळा वाढवण्याचा निर्णयही पालिका घेणार आहे
































































