
कोरोनामुळे ई-लर्निंगची गरज अधिकच वेगाने जगासमोर आली. ज्यांना आपल्या क्लिनिकल प्रॅक्टिसच्या पद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणण्याची, आपले ज्ञान अद्ययावत करण्याची ईच्छा आहे, मात्र त्यासाठी फारसा वेळ नाही अशांसाठी ई-लर्निंग अभ्यासक्रमासाठी बीएमजेसारख्या संस्था आघाडीवर आहे.
आरोग्यक्षेत्रात कार्यरत व्यक्तींना दैनंदिन पातळीवर अधिक चांगले निर्णय घेता यावेत यासाठी त्यांची मदत करण्यासाठी बीएमजे इंडियाच्या अभ्यासक्रमांची रचना केली आहे. सध्या बीएमजेच्या संग्रहामध्ये सहा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. संस्थेने मधुमेहापाठोपाठ किडनीचे दुर्धर आजार, पॅलिएटिव्ह केअर, रिसर्च टू पब्लिकेशन, अॅक्युट कोरोनरी सिंड्रोम आणि श्वसनाच्या समस्या या विषयांतील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अधिक माहिती educationindia.bmj.com येथे उपलब्ध आहे.
































































