बॉबी साकारणार डॅशिंग पोलीस, ‘क्लास ऑफ 83′ चा फर्स्ट लुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता बॉबी देओलचा ‘क्लास ऑफ 83’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा नुकतीच झाली आहे. या सिनेमातील बॉबीचा फस्र्ट लुक जारी झाला असून त्याने सोशल मीडियावर चांगलीच कमाल केली आहे. बॉबीचा फस्ट लुक फोटो बघून तो एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, असं दिसतंय. शिक्षा म्हणून बॉबीची पोस्टिंग होते. त्याला पोलीस अ‍ॅकॅडमीचे डीन केलं जातं, तरीही बॉबी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना धडा शिकवायचं ठरवतो. तो एक प्लॅन आखतो, मात्र या प्लॅनचा तो स्वतः  शिकार होतो. असे ‘क्लास ऑफ 83’  चे असे आहे. अतुल सबरवाल यांचे दिग्दर्शन असून गौरी खान आणि गौरव वर्मा निर्माते आहेत. बॉबीची ही धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बघायला त्याचे चाहते उत्सुक आहेत.