
20 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या दोन हिंदुस्थानी पर्यटकांचे मृतदेह नेपाळच्या मनांग जिह्यात आढळले. आठवडय़ापासून शोधमोहीम सुरू असल्यानंतर बर्फात दबलेले हे मृतदेह सापडले, असे सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. मृतांमध्ये 52 वर्षीय जिग्नेश पुमार लल्लूभाई पटेल आणि 17 वर्षीय प्रियांशा कुमारी पटेल यांचा समावेश आहे. हे दोघे मालेरिपा मठ दर्शनासाठी न्गिसयांग येथील ग्यालजेन हॉटेलमधून बाहेर पडले होते. त्यांचा संपर्प तुटल्यानंतर हॉटेलने मनांग येथील एपीएफच्या पर्वतीय बचाव प्रशिक्षण पेंद्राला याची माहिती दिली होती. तेव्हापासून या दोघांचा शोध सुरू होता.
























































