
सामना ऑनलाईन,मुंबई
विविध आजारांवर अचूक औषधोपचार करण्याचा दावा करणाऱ्या, खोटय़ा व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवली. एफडीएच्या पथकांनी शहरातील 33 ठिकाणी छापे मारून विविध आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधी उत्पादकांचा सुमारे 20 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच या मोहिमेअंतर्गत ज्या वृत्तपत्रांत औषधांच्या आक्षेपार्ह जाहिराती प्रसिद्धी करणाऱ्या 40 प्रकरणांत नोटीस बजावल्या असून 57 दूरचित्रवाहिन्यांनादेखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
























































