
बॉलीवूडसाठी 2025 हे वर्ष खूप खास ठरलं आहे. या वर्षांत बॉलीवूडचे अनेक कपल आई बाबा झाले आहेत. अलिकडेच अभिनेत्री कतरिना आणि विक्की यांनी एका गोंडस मुलाला जम्न दिला. यानंतर आता आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या घरी देखील नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. पत्रलेखाने एका गोंडस राजकुमारीला जन्म दिला आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्येही सध्या आनंदी वातावरण आहे.
अभिनेता राजकुमारने स्वत: सोशल मीडियावर याबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. Blessed with Baby Girl असं त्याने पोस्टमध्ये म्हटल आहे. 15 नोव्हेंबर हा दिवस राजकुमार आणि पत्रलेखासाठी खूप खास आहे. याच दिवशी या दोघांचे लग्न झाले होते. आज राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली असून त्यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे.
View this post on Instagram
राजकुमारने पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये याचा उल्लेख केला आहे. आमच्या लग्नाच्या 4 थ्या वाढदिवशी देवाने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. राजकुमारच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राजकुमार आणि पत्रलेखाने जुलै महिन्यात Baby on the way असे म्हणत ते आई बाबा होणार असल्याची घोषणा केली होती.
View this post on Instagram
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 11 वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न केले. त्यांची पहिली भेट 2010 मध्ये झाली होती. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर, 2021 मध्ये हे जोडपे लग्नबंधनात अडकले. आता, लग्नाच्या चार वर्षांनी, ते आई बाबा झाले आहेत.





























































