
अभिनेत्री राधिका आपटे लग्नाच्या बारा वर्षानंतर आई होणार आहे. नुकतेच तिने स्टायलिश अंदाजात बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर बेबी बंप फ्लॉन्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
राधिका लंडनच्या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर काळ्या रंगाच्या मिडी ड्रेसमध्ये दिसली. तिथे तिचा सिनेमा ‘सिस्टर मिडनाइट’ चा प्रिमिअर झाला. त्यावेळीच राधिकाने आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. ऑफ शोल्डर मिडी ड्रेसमध्ये राधिका अगदी लक्षवेधक ठरत होती. तिचा प्रेग्नेसी ग्लो चेहऱ्यावर दिसत होता.
View this post on Instagram
राधिकाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने फोटोंसोबत SISTER MIDNIGHT UK Premier अशी फोटोओळ लिहीली आहे. मात्र बेबी बंपचे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या पोस्टवर भरभरुन शुभेच्छा दिल्या. शिवाय अभिनेते विजय वर्मा यांनी देखिल तिचे अभिनंदन केले. एका युजरने लिहीलेय की, ओह माय गॉड, ती प्रेग्नेंट आहे. किती चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या युजरने लिहीले की, प्रिमियर आणि प्रेग्नेसी दोन्हीसाठी अभिनंदन तर अन्य एका युजरने लिहीले की, ओह राधिका, तू कमालिची सुंदर दिसत आहेस. राधिका आपटेने 2012 मध्ये ब्रिटीश संगीतकार आणि कम्पोजर बेनेडिक्ट टेलर यांच्याशी लग्न केले आहे. हे जोडपं कधी मुंबई तर कधी लंडनमध्ये राहतात.