लहानपणी माझ्यावर बलात्कार झालेला, प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलमानची एक्स गर्लफ्रेण्ड आणि 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोमी अली हिने नुकताच तिच्या आयुष्यातील मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका मुलाखतीत तिने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षापर्यंत तिच्यावर तीन वेळा बलात्कार झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानची सोमी अली ही एक्स गर्लफ्रेण्ड म्हणून ओळखली जाते. तिने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान तिच्यावर तीन वेळा बलात्कार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. त्यात ती म्हणतेय अनेकदा आपल्यासोबत नेमकं काय घडणार आहे याचा कोणीच अंदाज लावू शकत नाही. इच्छा असतानाही आपण तो भयंकर अनुभव कोणासमोर व्यक्त करु शकत नाही अशी परिस्थिती माझ्यावर ओढवली होती असे तिने त्या मुलाखतीत व्यक्त केले.

90च्या दशकात सोमी अली लाइमलाईटमध्ये होती. त्यावेळी सलमान खान आणि सोमी अलीच्या अफेरच्या चर्चा समोर आल्या होत्या. पण काही काळाने दोघांचे ब्रेकअप झाले. सध्या सोमी ‘नो मोर टिअर्स’ या सामाजिक संस्थेसोबत काम करतेय. सोमी पुढे म्हणते की, वयाच्या पाचव्या वर्षी पाकिस्तानात तिच्यावर बलात्कार झाला होता. त्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी दुसऱ्यांदा आणि वयाच्या चौदाव्या वर्षी तिच्यावर तिसऱ्यांदा बलात्कार झाल्याची आठवण काढत मुलाखतीत अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.

पुढे ती म्हणते अनेक वर्ष ते भयंकर प्रसंगाच्या आठवणी माझी पाठ सोडत नव्हत्या. आठवल्यावर दचकून उठायचे. अनेकदा प्रयत्न करुनही घाबरुन घरच्यांसमोर व्यक्त होता आले नाही. मला वाटायचे पुन्हा माझ्यासोबत असेच काहीतरी होईल. सतत भिती वाटायची त्यामुळे त्या स्थितीतून मला बाहेर पडता येत नव्हते. माझ्या आयुष्याला जसा ब्रेकच लागला होता. मात्र एकवेळ आली जिथे मी स्वत:ला सांभाळले आणि स्वत:मध्य़े आत्मविश्वास निर्माण केल्याचे ती सांगते.

सोमी वयाच्या सोळाव्या वर्षापासून सलमानवर प्रेम करत होती. त्याच्यासाठी ती मुंबईला आली होती. तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सलमानसोबत ती नात्यात होती. मात्र 1999 मध्ये काही कारणाने त्या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यादरम्याने तिने सैफ अली खान, चंकी पांडे, मिथुन दा, सुनील शेट्टी, ओम पुरी, जितेंद्र या बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. ओम पुरीसोबत चुप या सिनेमातून ती शेवटची दिसली आणि त्यानंतर ती अमेरीकेला परतली.