आधी माईकने मारलं मग मोबाईल फेकला; आदित्य नारायणवर नेटकरी संतापले

प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि गायक आदित्य नारायण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. एका चुकीच्या कृत्यांमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वास्तविक, त्याचा एक कॉन्सर्टमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका चाहत्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे आदित्य पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

आदित्य नारायण नुकताच भिलाई येथील एका कॉलेजमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. याच कॉन्सर्टचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका चाहत्याला त्याचे फोटो क्लिक करताना पाहून आदित्य त्याच्यावर संतापला. त्याला राग अनालर झाल्याने त्याने आधी त्या व्यक्तीला त्याच्या माईकने मारले. मग नंतर त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तो हवेत फेकून दिला. आदित्यच्या अशा गैरव्यवहारामुळे चाहते त्याच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत.

आदित्यच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक वाईट कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, आदित्य नारायणला काय प्रॉब्लेम आहे, त्याला कशाचा अभिमान आहे? असा खोचक सवाल केला आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, हा जोकर कोण आहे आणि तुम्ही याला इतके महत्त्व का देता? तर आणखी एकजण म्हणाला की, जनता मूर्ख आहे, ते त्यांचे काम सोडून त्यांच्या शोमध्ये लढायला जातात. अशा लोकांना दोष देण्यात काय अर्थ आहे? बॉलीवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधला हाच फरक आहे, साऊथ आपल्या चाहत्यांचा खूप आदर करते. तर बॉलीवूड लोक त्यांचा चाहत्यांना काडीचीही किंमत देत नाही. असे म्हणत आदित्यसोबतच बॉलीवूडवरही संताप व्यक्त केला आहे.