Cannes 2024 : तारक मेहता फेम दीप्तीचा कान्समध्ये डेब्यू; केशरी गाऊनमध्ये रेड कार्पेटवर जलवा

फ्रान्समध्ये आजपासून 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली. यामध्ये इंडस्ट्रीतील नामांकित सौंदर्यवतींचे फोटो समोर येत आहेत. याच यादित तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दीप्ती साधवानीचेही नाव आहे. दीप्ती साधवानीने रेड कार्पेटवरील आपल्या मनमोहक लुकने लोकांना चाहत्यांना भुरळ घातली आहे. दीप्ती साधवानी कान्स फिल्म फेस्टिव्हलला जाणार असल्याची कोणतीही बातमी आत्तापर्यंत आली नव्हती, त्यामुळे सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते घायाळ झाले.

दीप्ती साधवानी 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये Le Deuxième Acte (The Second Act) या फीचर फिल्मच्या प्रीमियरसाठी उपस्थित होती. यावेळी तिने केशरी रंगाचा गाऊन परिधान केला होता.


दीप्तीने ऑरेंज ट्रेल गाउन परिधान करून कान्सच्या रेड कार्पेटवर रॅम्प वॉक करून चाहत्यांना भुरळ घातली आहे. ऑफ शोल्डर थाई स्लिट गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.


आपल्या गाऊनचा ट्रेल आतापर्यंतचा सर्वात लांब ट्रेल आहे, असा दावा दीप्तीने केला आहे. दीप्तीचे फोटो व्हायरल झाले असून चाहत्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या आहेत.


दीप्तीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ड्रेससोबत कानात डायमंडचे सुंदर झुमके आणि हातात ब्रेसलेट घातले आहे. तसेच डोळ्यांनाही सुंदर मेकअप केला आहे.