उदरनिर्वाहासाठी ‘ही’ मराठी अभिनेत्री चालवतेय रिक्षा, बोमन इराणींनी शेअर केला व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अभिनेता बोमन इराणी यांनी मोदींना व भाजपल विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. बोमन मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेते बोमन इराणी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात ते एका रिक्षा चालविणाऱ्या तरुणीसोबत तिच्या रिक्षात बसलेले दिसत आहेत. ही रिक्षा चालविणारी तरुणी मराठी मालिकांमधील अभिनेत्री असून ती अभिनयासोबत रिक्षा चालवून तिचा उदरनिर्वाह चालवते. लक्ष्मी असे त्या अभिनेत्रीचे नाव असून बोमन इराणी यांनी तिला रिलअ हिरो म्हटले आहे.


या व्हिडीओत लक्ष्मी ही रिक्षा चालवताना दिसत आहे. त्याचवेळी मागून बोमन इराणींची गाडी येते व ते तिला हाक मारतात. त्यानंतर गाडीतील प्रवाशी बोमन इराणींसोबत फोटो काढण्याची विनंती केली. त्यानंतर बोमन इराणी यांनी लक्ष्मी सोबत व्हिडीओ काढून तिची ओळख करून दिली तसेच तिच्या जिद्दीला सलाम देखील केला. तिच्यासोबत शेअर केलेल्या या व्हिडीओला लाखो लाईक्स मिळाले आहेत.