
दिल्लीनंतर आता बंगळुरूमधील किमान 40 शाळांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस सक्रिय झाले आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली. परंतु आतापर्यंत कोणत्याही संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती मिळालेली नाही.
दिल्लीतील 3 शाळांना बाॅम्बने उडवण्याची धमकी, बाॅम्ब शोध पथकाचा तपास सुरु
मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, आरआर नगर आणि केंगेरीसह 40 शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. यासाठी एक ईमेल पाठवण्यात आला होता. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. बंगळुरू शहर पोलिसांनी शाळांमध्ये अनेक पथके तैनात केली आहेत. बॉम्ब निकामी पथकाचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत आणि विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शाळेच्या परिसराची तपासणी करण्यात आली आहे.