
गेल्या अनेक वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसाठी खूशखबर आहे. नायगाव येथील बॉम्बे डाइंग मिलच्या आठ एकर जागेवर म्हाडातर्फे गिरणी कामगारांसाठी सुमारे 3 हजार 350 घरे उभारण्यात येत असून मेअखेरीस हे काम पूर्ण होणार आहे. 24 मजली तब्बल 16 टॉवरचे बांधकाम सुरू असून यातील 11 टॉवर गिरणी कामगारांच्या पुनर्वसनासाठी तर 5 टॉवर ट्रान्झिटसाठी आहेत. 225 चौरस फुटांची तब्बल 3,350 घरे येथे बांधण्यात येत आहेत.

































































