
कांजुरमार्ग येथील नौदलाच्या सिव्हिलियन सोसायटीतून शाळेत जाण्यासाठी परवानगी देत उच्च न्यायालयाने शालेय विद्यार्थ्यांना दिलासा दिला. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने मंगेश आचरेकर व अन्य पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर हे आदेश दिले. सुरक्षेच्या कारणास्तव नौदलाच्या सोसायटीतून शाळेत जाताना विद्यार्थी, पालकांना स्मार्ट फोन व कॅमेरावाला मोबाईल नेता येणार नाही, अशी सक्त ताकीद न्यायालयाने दिली आहे.