
गुरुवारी मुंबई शेअर बाजारात आज कामकाज बंद होताना पाच अंकांची घसरण पाहायला मिळाली. आज मुंबई निर्देशांक पाच अंकांनी घसरून 66,017 वर बंद झाला. निफ्टीही फारसं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं नाही. कामकाजाच्या दिवशी निफ्टी 19,810 वर असल्याचं पाहायला मिळालं.
शेअर बाजारात बँकिंग, ऑटो आणि मेटल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याची नोंद झाली आहे.
गुरुवारी शेअर बाजारात हिरो मोटोकॉर्प, बजाज अॅटो, बीपीसीएल आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स चांगल्या वाढीसह बंद झाले. याउलट सिप्ला, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय लाइफ यांच्या शेअर्समध्ये आज घसरण पाहायला मिळाली.
गुरुवारी निफ्टी मिडकॅप 100 मध्ये कोणताही बदल झाला नाही. निफ्टी आयटी अर्ध्या टक्क्यांनी घसरणीसह तर निफ्टी बँक चार टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस तेजीसह बंद झाले तर निफ्टी फार्मा निर्देशांकात घसरण झाली.


























































