
>> गणेश उदावंत
महर्षी वाल्मीकी यांचे ‘रामायण’ आणि महर्षी व्यासमुनी यांचे ‘महाभारत’ हे दोन महान काव्यग्रंथ हिंदुस्थानचे धर्मग्रंथ ठरले आहेत. आदर्श राजा तो, ज्याने जनतेचे हित जोपासले. मर्यादापुरुषोत्तम, महापराक्रमी-अजिंक्य ठरलेले श्रीराम यांचे चरित्र रामायणातील प्रत्येक ओळीतून आदर्शवत राहिले आहे. या उलट महाभारताची कथा आहे. यातील प्रत्येक पात्र समकालीन समाजजीवनाशी निगडित राहिले आहे. महाभारतातील प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्र्ााr असो की पुरुष, त्यांच्यात वैविध्यपूर्ण चित्रण दिसते. भावंडांमधील संघर्ष, मैत्रीपूर्ण व्यवहार, चालीरीती, युद्धजन्य परिस्थिती, घटित-अघटित पेचप्रसंग अशा नानाविध घटनांनी महाभारताची झालेली मांडणी आजही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारी आहे. प्रसंगानुरूप रागद्वेष उद्भवत असला तरीही,
कुळाची कीर्ती आणि कुलधर्म पाळण्याची पूर्वापार परंपरा स्त्र्ायांच्या खांद्यावर टाकण्यात आलेली आहे. जी स्त्र्ााr कुलधर्म पाळणारी नसेल तर ती ‘कुलटा’ ठरते! तरीही स्त्र्ायांच्या वाटय़ास दुःख मोठय़ा प्रमाणावर येते. पुरुषांच्या तुलनेने स्त्र्ायांना चारित्र्याशी खेळण्याचा प्रकार पदोपदी सोसावा लागतो. रामायणात सीतेने अग्निपरीक्षा दिली. महाभारतात पांडवांची भार्या द्रौपदी सतत दुर्दैवाच्या फेऱयांत अडकलेली, तर हस्तिनापूरचा सम्राट ययाती राजाची कन्या माधवी, कवी कुलगुरू कालिदास यांनी अजरामर केलेली इंद्रसभेतील रूपवती मेनका, सुपुत्री शकुंतला, हस्तिनापूरचा सम्राट धृतराष्ट्रची भार्या अन् 101 पुत्रांची माता गांधारी यांच्या जीवनाची वाटचाल, तर दुसरीकडे आदर्शपुत्र पांडवांची माता कुंती यांच्या परस्पर सहजीवनाची कथा वैविध्यपूर्ण असली तरी महाभारतातील सर्वच स्त्र्ााrपात्रांच्या अंगावर राजवस्त्रं कितीही अलंकारित असली तरी त्यांच्या पदरी दुःखाच्या असंख्य गाठी पडलेल्या असल्याचे कळून चुकते.
पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्रा. डॉ. सर्जेराव जिगे यांनी ‘महाभारतातील स्त्र्ाया ः नवा अन्वयार्थ’ हा वैचारिक ग्रंथ लिहून महाभारतातील खंडकाव्यात ज्या स्त्र्ााr व्यक्तिरेखा आलेल्या आहेत, त्यावर अभ्यासपूर्ण व्यापक चित्रण केलेले आहे. या मांडणीत ललित साहित्यातून शब्दबद्ध झालेले व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू डॉ. जिगे यांनी प्रस्तुत ग्रंथात चांगल्या प्रकारे मांडले आहेत. त्यानुसार महाभारतातील स्त्र्ााrपात्रे दुःखावेगाने आकंठ भरलेली दिसतात.संभाजीनगरातील चिन्मय प्रकाशन संस्थेने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. प्रदीप म्हैसेकर यांची पाच पानी प्रस्तावना आहे.
‘‘महाभारताचा अभ्यासच मुळात श्रमदायी प्रक्रिया आहे. त्यातही त्यातील चरित्रांचा अभ्यास अधिक कष्टसाध्य आहे. या अभ्यासासह चरित्रांशी संबंधित असणाऱया साहित्यकृतींचा शोध घेऊन महाभारतातील चरित्रांच्या उजेडात मांडणी करायची हे जिकिरीचे काम, बुद्धीस आव्हान देणारे काम, पण लेखकाने आव्हानाचे हे शिवधनुष्य पेलले,’’ असा गौरव म्हैसेकर यांनी केला, तो सार्थ ठरणारा आहे. शतपुत्रा गांधारी, राजमाता कुंती, याज्ञसेनी द्रौपदी, सत्यवती, शकुंतला, देवयानी, शर्मिष्ठा, अंबा, माद्री, दमयंती, सावित्री आणि माधवी या 12 स्त्र्ााr पात्रांवर पुस्तकाचा आवाका आहे. त्यातही मध्यवर्ती पात्र असलेल्या द्रौपदी आणि माधवी यांच्या कथा रंजक असल्या तरी अंतर्मुख करणाऱया आहेत. या सर्व स्त्र्ाया पतिक्रता असल्या तरी बुद्धिमान असूनही सोशिक आहेत. महाभारतातील स्त्र्ायांच्या जीवनात सुखादुःखाचा आकार आहे, तो आजच्या स्त्र्ााrजीवनातही आढळून येतो. परंपरांच्या जोखडात बंदिस्त स्त्र्ायांचे भावांदोलन व भावस्पंदने कमीअधिक फरकाने आज उमटलेली दिसतातही. पुस्तकाचे अपूर्वा ग्राफिक्सने काळय़ा पार्श्वभूमीवर रेखाटलेले मुखपृष्ठ सुंदर असून, प्रणीत ग्राफिक्स यांची सजावटही दर्जेदार झाली आहे.
महाभारतातील स्त्रिया – नवा अन्वयार्थ
लेखक – डॉ. सर्जेराव जिगे
प्रकाशन – चिन्मय प्रकाशन, संभाजीनगर
पृष्ठs – 320, किंमत – 320 रुपये





























































