बुकी अनिल जयसिंघानीला जामीन

बुकी अनिल जयसिंघानीला विशेष सत्र न्यायालयाने सोमवारी सर्शत 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देऊन अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा जयसिंघानीवर आरोप आहे.

फेब्रुवारी महिन्यात जयसिंघानी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्याच्या जामिनाला सरकारी पक्षाने विरोध केला होता. मात्र न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. जयसिंघानीने दररोज न्यायालयात हजेरी लावावी. साक्षीदारांना धमकावू नये. त्यांना कसलेही अमिष दाखवू नये. पासपोर्ट तपास अधिकाऱयाकडे जमा करावा. सुनावणी न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, अशा अटी न्यायालयाने जयसिंघानीला घातल्या आहेत.