
सनी देओलचा बहुचर्चित ‘बॉर्डर-2’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 26 जानेवारीच्या आधी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात देशभक्ती, उत्साह आणि अॅक्शन पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्या भूमिका आहेत. चित्रपट निर्माता करण जोहरने चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे काwतुक केले आणि अभिनेता वरुण धवनच्या अभिनयावरून ट्रोल केल्याबद्दलही उत्तर दिले.



























































