बॉर्डर 2 ची बॉक्स ऑफीसवर बंपर कमाई; अवघ्या दोन दिवसात 100 कोटींचा टप्पा पार

बॉर्डर 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. हा चित्रपट २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने अवघ्या 2 दिवसांत 100 कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली आहे. 26 जानेवारीच्या आधी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात देशभक्ती, उत्साह आणि अॅक्शन पाहायला मिळत आहे. बॉर्डर २ ने २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपट धुरंधरला मागे टाकले आहे. शिवाय, बॉर्डर २ ने हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रेमकथेतील ‘सैयारा’ चित्रपटाच्या पहिल्या कमाईपेक्षा जास्त कमाई केली आहे.

बॉर्डर चित्रपटाचा हा स्वतंत्र सिक्वेल आहे, जो टी-सीरीज फिल्म्स आणि जे. पी. फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित केला आहे. यांनी हिंदुस्थानात बॉर्डर २ च्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे अधिकृत आकडे जाहीर केले आहेत. बॉर्डर २ ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३२.१० कोटी कमाई केली. परदेशातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, बॉर्डर २ ने ३.३४ कोटी कमावले आहेत, ज्यामुळे त्याची जगभरातील कमाई ४१.५५ कोटी झाली आहे. याचा अर्थ बॉर्डर २ दिवसांत बॉक्स ऑफिसवर १०० कोटी चा टप्पा सहज ओलांडला आहे.

या चित्रपटात सनी देओल प्रमुख भूमिकेत आहे. तर, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ सहकलाकार  आहेत. तसेच 30 वर्षांनी देखील सनी देओलचा तोच उत्साह आणि जोश या चित्रपटात दिसून येत आहे.